Viral Video: सोशल मीडियावर काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्यूज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं तर कधी कोणी सुमधूर आवाजात गाणं गाताना दिसतं. शिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘घनी बावरी’ या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी आजूबाजूला अनेकजण उभे असून तिचा डान्स पाहून तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

हेही वाचा: खऱ्या प्रेमाला वयाचं बंधन नसतं… आजी-आजोबांचा तो सुंदर VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि साठ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “एकदम कडक आहे यार डान्स” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “जबरदस्त डान्स खूप मस्त” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एक्स्प्रेशन्स क्वीन आहेस तू.” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video girl performed a great dance on the song gani bavari users appreciate seeing the video sap