Viral Video: सोशल मीडियावर नेहमी विविध विषयांवरील व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यातील काही व्हिडीओ आपल्या मनाला आनंद देणारे तर काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवणारे असतात. ज्यातील अनेक व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माणूस आजारी पडला की त्याला बरं करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. उपचारासाठी लाखो रुपये खर्च केलेल्या त्याच्या घरचे तो सुखरूप घरी कधी येईल याची वाट पाहतात. पण, कधी कधी त्या व्यक्तीबरोबर असं काहीतरी घडतं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता समोर आलेल्या व्हिडीओत अशीच एक भयानक घटना पाहायला मिळत आहे, जी पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेलं जात असून त्या वॉर्डमध्ये जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला जातोय. यावेळी दोन वॉर्ड बॉय रुग्णाला फिरत्या बेडवरून लिफ्टजवळ घेऊन येतात. त्यातील एक जण रुग्णाबरोबर लिफ्टमध्ये जातो, तर मागून दुसरा बेड आत ढकलतो, इतक्यात लिफ्ट सुरू होते. मागे असलेला वॉर्ड बॉय आणि त्या रुग्णाची नातेवाईक असलेली महिला पटकन रुग्णाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण लिफ्ट खाली निघून जाते. ते दोघेही मागे सरकतात.

पुढच्या फुटेजमध्ये लिफ्टमध्ये यावेळी काय घडलं हे दाखवण्यात आलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, लिफ्ट अचानक खाली आल्यामुळे बेड मागच्या बाजूने वर होतो, ज्यामुळे रुग्ण उलट्या बाजूला डोक्यावर पडतो. यावेळी रुग्णाचा लिफ्टमध्ये अडकून जीव गेल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @its.aniket_patil.96k या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “ज्यावेळी त्यांनी बोलावलं त्यावेळी जावंच लागतं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूपचं भयानक”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप वाईट, वेदनादायी.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video patients death caused by the hospitals lift shocking video sap