Viral Video : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. कधी डिस्काउंट तर कधी ऑफर्स तर कधी एकावर एक फ्री अशा खास गोष्टीसुद्धा ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. अशातच जर एखाद्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांवर ऑफर असेल तर आपल्यातील अनेक जण नक्कीच अनुभव घ्यायला जातील. पण, तुम्हाला जर एखादा पदार्थ खाण्यासाठी डान्स करण्यास सांगितले तर तुम्ही कराल का? नाही… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (viral Video) यूएसमधील आहे. यूएसमधील मिडलबोरो, मॅसॅच्युसेट्स का कॅफे ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आला आहे. या कॅफेत प्रवेश (एंट्री) घेताना तुम्ही जर डान्स केलात तर तुम्हाला फ्री कॉफी दिली जाईल. तर ही ऑफर पाहून अनेक ग्राहक डान्स करत कॅफेमध्ये नाचत येतात. सगळ्यात आधी एक महिला कॅफेमध्ये येते, त्यानंतर चप्पल काढते आणि नाचण्यास सुरुवात करते. तर एकदा व्हायरल व्हिडीओतून बघाच ही खास ऑफर आणि ग्राहकांनी या ऑफरला दिलेला प्रतिसाद.

हेही वाचा…‘चल सोडतो तुला… ‘ श्वानाला दिली थेट गाडीत बसण्याची ऑफर अन्…; पाहा मजेशीर VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

कॅफेत खास ऑफर

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, कॉफी आणि आनंद या दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. कारण कॅफेत एक खास ऑफर ठेवण्यात आली आहे, ज्यात तुम्हाला डान्स करून कॅफेच्या काउंटरपर्यंत यायचं आहे आणि याबदल्यात तुम्हाला एक फ्री कॉफी दिली जाईल. तर या ऑफरला सुरुवात होते आणि अगदी आई-लेक, महिला, तरुणी ते अगदी वृद्ध जोडप्यांपर्यंत सगळेच जण आनंदात नाचत कॅफेत प्रवेश करतात आणि फ्री कॉफी घेऊन जातात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hoperisesnetwork आणि @coffeemilan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आणि व्यापार आणखीन वाढण्यासाठी ही नवीन आणि अनोखी ऑफर व्यापारी घेऊन आला आहे, ज्यात ग्राहकांना आनंदही मिळेल आणि त्याचा व्यापार इतर ग्राहकांच्यातर्फे आणखीन लोकांपर्यंतही पोहचेल. हा व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा व्यापाऱ्याच्या या अनोख्या कल्पनेचं कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows free coffee to anyone who enters while dancing in cafe asp