Viral Video : आजकाल श्वानांना पाळीव प्राणी म्हणून घरात हक्काचे स्थान दिले जाते. पण, काही भटके श्वान असे असतात की, जे माणसांना विनाकारण त्रास देतात. ते दुचाकी किंवा चारचाकी वाहन असो; त्यांच्यामागून पळत सुटतात. तसेच, काही माणसांना पाहून त्यांच्यावर भुंकण्यास सुरुवात करतात आणि त्यामुळे अनेक जण या भटक्या श्वानांना घाबरतात. आज यावर उपाय म्हणून की काय एका तरुणाने मजेशीर रील बनवली आहे. या रीलमध्ये तो श्वानाला गाडीच्या मागे धावत येण्याऐवजी गाडीत बसण्याची ऑफर देतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तरुण गाडीत बसला आहे आणि रस्त्याच्या कडेला एक श्वान उभा आहे. तसेच कारमध्ये तरुणाच्या बाजूला बसलेली अज्ञात व्यक्ती ही रील शूट करते आहे. रस्त्याकडेला थांबलेल्या श्वानाला पाहून तरुण ‘पुढेपर्यंत सोडू का तुला’ असं विचारतो. तेव्हा श्वान त्याच्याकडे बघतो आणि दुसरीकडे त्याचे तोंड फिरवतो. तेव्हा पुन्हा तरुण ‘चल, सोडतो ना तुला पुढेपर्यंत, तुझ्या मित्रालासुद्धा बरोबर घे’, असं म्हणतो. यादरम्यान श्वानाचे हावभाव पाहण्यासारखे असतात. दोघांचा संवाद व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘बालपणातील संस्कार आयुष्य घडवते…’ भजन ऐकून मान डोलावणारा चिमुकला VIRAL VIDEO तून तुम्हीसुद्धा बघा

व्हिडीओ नक्की बघा…

त्यापेक्षा तुला गाडीतूनच सोडतो ना

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, नेहमी गाडीमागून पळत येणाऱ्या श्वानाची तरुण जणू काही शाळा घेताना दिसत आहे. “तसंपण तू गाडीच्या मागून धावत येतोस. त्यापेक्षा तुला गाडीतूनच सोडतो ना”, असं तरुण श्वानाला गमतीत म्हणतो. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुणाचे ओरडणे, त्याची गंमत करणे, तक्रार करणे या कोणत्याच गोष्टीवर श्वान व्यक्त न होता, गुपचूप ऐकत असतो. तसेच त्या तरुणावर भुंकतसुद्धा नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसतात, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vjpawansingh08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये हसण्याच्या ईमोजी दिल्या आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा पोट धरून हसत आहेत. “तुम्ही त्याला सोडण्याऐवजी श्वानच तुम्हाला सोडून येईल”, “सोसायटीमध्ये खूप श्वान झाले आहेत” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स, तर काही जण “आम्हीपण तुमच्या सोसायटीमध्ये राहतो”, असे तरुणाला आवर्जून कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows instead of running behind the car in the man offer street dog to sit in the car asp