Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. ज्यात कधी रिल्स, गाणी, डान्स व्हिडीओ पाहायला मिळतात; तर कधी प्राण्यांचेदेखील विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओदेखील असतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका मांजरीसोबत एक गमतीशीर खेळ खेळताना दिसत आहेत.

अनेक जण घरात कुत्रा आणि मांजर पाळतात, अनेक घरांमध्ये या प्राण्यांना घरातील सदस्यांइतकेच महत्व आणि प्रेम दिलं जातं. पण, समाजात काही लोक असेदेखील असतात, जे या पाळीव प्राण्यांना विनाकारण त्रास देतात व प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण रस्त्यावरील एका मांजरीसोबत खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण रस्त्यावरील एका काळ्या रंगाच्या मांजरीच्या पुढच्या दोन्ही पायांना पकडून तिच्यासोबत गोल गोल फिरत आहेत, यावेळी ते उड्यादेखील मारताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळाने ते दोघे तिथून निघून जातात. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने “फु बाई फु फुगडी फू….” असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे.

हेही वाचा: “आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे”; हत्तीच्या पिल्लाचा अनोखा खेळ; VIDEO पाहून युजर्सही करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @mi_maau_premi या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून तर या व्हिडीओवर आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सत्तावीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तर या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अरे हा कुठला डान्स आहे.” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “प्लीज असं करू नका, तिला त्रास होत असेल.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती वेडे लोक आहेत, काहीही करतात”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “पागल लोक.”