Viral Video: या जगात आई आणि तिच्या मुलाच्या नात्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. या निखळ, पवित्र नात्यावर आजपर्यंत अनेकांनी काव्य, कथा, रचल्या आहेत. तसेच विविध नाटके, चित्रपट निर्माण केले गेले आहेत. त्यातून आई आणि मुलाच्या नात्यातील प्रेम पाहायला मिळते. याच चित्रपटातून आईवरील काळजाला भिडणारी अनेक गाणीही तुम्ही ऐकली असतील. आता सोशल मीडियावर दोन मुलं आपल्या आईसाठी असंच एक गाणं गाताना दिसत आहेत, जे ऐकून तुम्हालाही तुमच्या आईची आठवण येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. यांपैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय; ज्यात दोन मुलं आईसाठी गाणं गाताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन भावंडं आईबरोबर घरामध्ये बसली असली असून, ती आईसाठी ‘तेरी उंगली पकड़ के चला’ हे गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी भावंडांपैकी लहान मुलाचा काळजाला भिडणारा आवाज ऐकून आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यानंतर तीदेखील मुलांबरोबर गाणं गायला सुरुवात करते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @khichdishorts या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video two brothers song sung for mother emotional video viral sap