देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषत: इन्स्टाग्रामवर देसी जुगाड व्हिडीओंनी तर कहर केला आहे. यात लोक टाऊक वस्तूंचा वापर करुन स्वतात मस्त अशा उपयोगी वस्तू बनवताना दिसतात. यात आता पुन्हा देसी जुगाडचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीने चक्क गाडीच्या टायरपासून बाईकचा मडगार्ड बनवला आहे. जो पाहून तुम्हीही म्हणाल की, जुगाड छान आहे तितकाच जोखमीचाही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मडगार्डसाठी सॉलिड जुगाड

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने हाताने सेल्फ मेड मडगार्ड बनवला आहे. देसी जुगाड करुन बनवलेला हा मडगार्ड टायरपासून बनवण्यात आला आहे. जो पाहून अनेकजण म्हणत आहे की, हा अतिशय सामान्य मडगार्ड आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला हातांनी स्पर्श करता तेव्हा तुम्हाला तो काहीतरी वेगळेच असल्याचे दिसेल.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकवर लावलेला मडगार्ड दाखवत म्हणत आहे की, ‘भावांनो, हा जगातील सर्वोत्तम जुगाड आहे. टायरपासून बनवलेले मडगार्ड… हा शेतकरी आहे, तुम्हीच बघा… कितीही चिखलात अडकला तरी हा मडगार्ड तुटणार नाही. खूप अप्रतिम मडगार्ड बनवला आहे, जो टायरपासून बनवला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

याने धोका आहे ‘बॉस’!

या व्हिडिओवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चुकून तो मडगार्ड टायरमध्ये अडकला तरी संपूर्ण जुगाड बिघडून जाईल, असे लोकांचे म्हणणे आहे. तर काही युजर्स, भावा ज्या दिवशी टायर पावसात अडकेल त्या दिवशी तुम्हाला बाईक चालवता येणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch desi jugad video man made motorcycle mudguard viral video sjr