Viral Video: मृत्यू या शब्दाचे नाव जरी ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. पण, निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. परंतु तो कधी, कुठे, कोणत्या अवस्थेत होईल हे सांगता येत नाही. काही जणांना अनेक वर्ष एखाद्या गंभीर आजाराचा सामना करूनही दीर्घायुष्य लाभतं तर काहींचा अल्प वयातच मृत्यू होतो. समाजमाध्यमांवर नेहमीच या संदर्भातील व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यात मोठ्या अपघातामध्ये अडकलेला व्यक्ती सुखरूप बचावतो, तर एखादी व्यक्ती बसल्या जागी अचानक मरण पावते. दरम्यान, आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चक्क नवरीच्या वरातीचा अपघात झाल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. परंतु, आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हायवेच्या बाजूला नवरीची वरात जात असून यावेळी नवरी गाडीमध्ये उभी राहून नाचताना दिसत आहे. तसेच तिचे नातेवाईक आणि वाजंत्रीवाले गाडीभोवती उभे राहून नाचत आहेत. यावेळी बाजूच्या रस्त्यावरून अचानक वेगाने एक कार येते आणि नवरीच्या गाडीच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांना उडवून पुढे निघून जाते. या अपघातामध्ये चार-पाच जणांना उडवल्याचे दिसत आहे. या गंभीर अपघातात वाजंत्र्यांसह नवरीच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचेही म्हटले जात आहे. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mamtaprem68 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “वेळ आणि मृत्यूचा काहीही भरोसा नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “नवरीच्या आयुष्यभर लक्षात राहील ही गोष्ट”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “अशी वेळ शत्रूवरपण येऊ नये”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप वाईट.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weeding accident viral video the car driver was flown while the wedding barat sap