[ie_dailymotion id=x7g1bgp] बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान हा इतर खान कलाकारांपेक्षा अनेक गोष्टींमुळे वेगळा ठरतो. आमिर कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही तसेच तो आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीकरिताही कोणत्याच शोमध्ये जात नाही. तो वेगळ्या पद्धतीने आणि हटके अंदाजात त्याच्या चित्रपटांची प्रसिद्धी करतो. आमिर एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जातोच पण एक जागरुक नागरिक म्हणूनही त्याच्याकडे बघितले जाते. यामुळेच त्याने आता एक पाऊल पुढे जात स्वतःसाठी तयार केलेला एक नियम मोडला आहे. नुकताच आमिरचा ५२ वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यादिवशी त्याने चक्क एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात आमिर त्याच्या पत्नीसह उपस्थित होता.