मंगला कपूर यांच्या आयुष्यावर आधारित ‘मंगला’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने शिवाली परब, अलका कुबल, शशांक शेंडे आणि दिग्दर्शिक अपर्णा होशींग यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. लहान वयात अॅसिड हल्ला झालेल्या मंगलाचं आयुष्य कसं बदललं, या परिस्थितीला त्या कशा सामोऱ्या गेल्या…हा संपूर्ण प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे.



















