नाभिक समाजाला बारा बलुतेदारांच्या सवलती मिळत नव्हत्या. नाभिक समाजाला अनेक उपेक्षा सहन कराव्या लागत होत्या. चौथीत असताना एका लग्नात गेले होते. तिथे आम्हाला आमचं ताट घेऊन जावं लागलं. त्यानंतर अन्न वरुन वाढलं गेलं.. ते मला मुळीच पटलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संस्कार माझ्या वडिलांनी माझ्यावर घडवले होते. त्यामुळे संघर्ष सुरु केला.