13 July 2020

News Flash

कन्हैया कुमारला महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत प्रवेश नाकारला


दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानपरिषेदत प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. माझ्याकडे प्रवेशाचा पास असतानाही जाणूनबुजून मला रोखण्यात आले, असा आरोप कन्हैयाने केला आहे. कन्हैया कुमार आज विधानपरिषेदतील वेगळ्या विदर्भाची चर्चा ऐकण्यासाठी आला होता. त्याने विधानपरिषदेत प्रवेश मिळविण्यासाठीचा पासही काढला होता. मात्र, ऐनवेळी सुरक्षारक्षकांनी त्याला प्रवेश नाकारला. कन्हैया कुमारला शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या शिफारसीवरून पास देण्यात आला होता. सध्या विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा गाजत आहे. आज विधानपरिषदेत वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. यासाठी दुपारी १२ ते १ अशी वेळ त्याला देण्यात आली होती.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X