मंगळवारी ‘सुपर डान्सर सीजन ४’ या शोच्या एपिसोडचे शूटिंग होते. या एपिसोडमध्ये अभिनेत्री करिष्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती. परंतु पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने शोचं शूटिंग रद्द केलं. शिल्पा शेट्टीने येण्यास नकार दिल्याने उर्वरित परीक्षकांच्या हजेरीत या शोचे शूटिंग करण्यात आलंय.

















