मराठा समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारमधील इतर नेत्यांनी भेट घेतली. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चाच झाली नाही. त्यामुळे आपण समाधानी नसल्याचं सांगत अमर देशमुख यांनी पुन्हा मराठा समाजाला घेऊन मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे.