Raj Thackeray: ‘ज्या पक्षाच्या अध्यक्षांनी परवा राजीनामा दिला आणि…’; राज ठाकरेंची पवारांवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तसंच शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. अजित पवार ज्या प्रकारे वागत होते ते पाहूनच बहुदा शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला असा टोला राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला. तसंच शरद पवारांच्या तोंडून कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे