‘पत्रकारांचा अवमान करणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध’; पत्रकारांच्या घोषणा अन् अतुल सावेंचा काढता पाय
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगामाच्या तयारी संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी आलेल्या पत्रकारांना वार्तांकनासाठी बैठकीत बसू न दिल्याने पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध नोंदवला. यानंतर सावे यांनी पत्रकारांशी न बोलता काढता पाय घेतला.