शिवसेनेच्या शिंदे गटाने ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर ही जाहिरात दिसतेय. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा दाखला देण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसती दर्शवली आहे. यावरुन सध्या बरीच चर्चा रंगली असून त्यामागील राजकारण नेमकं काय आहे, हे समजून घेऊ.