काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती. ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरणही पालिकेनं दिलं. मात्र त्यानंतर संतापलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. परंतु कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांचे पोस्टर काढण्याची परवानगी दिली होती, असा दावा आमदार नितेश राणेंनी केला आहे. या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.



















