राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामनाही बुधवारी पाहण्यास मिळाला. दोन्ही नेत्यांनी मुंबईत बैठका बोलवल्या होत्या. या सगळ्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुम्ही शिवसेना काय आहे ते दाखवून दिलं. ही लढाई एवढी घाणेरडी आहे विकृत आहे त्यांना शिवसेना का नको आहे कारण, महाराष्ट्रबद्दल त्यांचा मनात भरलेला द्वेष म्हणून त्यांनी शिवसेना फोडली आता राष्ट्रवादी फोडली आता ते महाराष्ट्र फोडतील तेव्हा त्यांना विरोध करायला कोणी नकोय आणि ते आता आपण होऊ देणार नाही’





















