विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आज अखेर पडदा पडला असून नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात रीतसर प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रवेशामागची आपली भूमिका स्पष्ट केली.




















