इर्शाळगड येथील गावात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे तातडीने दाखल झाले आहेत. संपूर्ण बचावकार्याचा ते आढावा घेत आहेत. अजून किती लोकं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत? मदतकार्य कसं सुरू आहे? या संदर्भातील सर्वात माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास ईर्शाळगडावरून हे भूस्खलन झालं होतं.




















