मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचे ठाण्यात स्वागत करताना विरोधकांना अनेक टोमणे मारले आहे. “गेल्या वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाहीये. काही विरोधक तिरक्या चालीचे असतात तर काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. पण, जनता सोबत असल्याने विरोधकच नेहमी चितपट होत आहेत. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्यासारख्या विरोधकांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रॅंड मास्टर बोललात” असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.




















