Ravindra Dhangekar यांनी सांगितला ‘हू इज धंगेकर’ या डायलॉगचा किस्सा!; लोकसभा उमेदवारीवरही स्पष्टीकरण
पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणरायची आरती झाल्यानंतर धंगेकरांनी लोकसत्ताशी संवाद साधला. यावेळी ‘हू इज धंगेकर’ या विधानावरून त्यांनी विधानसभेत किंवा मुंबईतील आमदारांचा किस्सा सांगितला आणि आगामी लोकसभा निवडणुकीत जर संधी मिळाली तर उभा राहून मोदींनाही पराभूत करेल असंही धंगेकर म्हणालेत.