Diva Railway Station: कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्या; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पनवेल कळंबोली येथे शनिवारी (३० सप्टेंबर) मालगाडीचे डबे रुळावरून घसरले होते. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने कोकणातील प्रवाशांनी दिवा स्थानकात रुळावर उतरून रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला
फटका बसला आहे. प्रवाशांना रेल्वे रुळावरून बाजूला करण्यासाठी पोलिसांचाही फौजफाटा यावेळी तैनात होता. वंदे भारत एक्स्प्रेस जाऊ शकते, मग आमच्या कोकणातील गाडी
का नाही, असा प्रश्नही प्रवाशांनी यावेळी उपस्थित केला.