राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या गुरुवारी (२३ नोव्हेंबर) पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत होत्या. तेव्हा अचानक एका आजीने सुप्रिया सुळेंना सध्याच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहा.