मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ फेब्रुवारीला दैनिक लोकसत्ताच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त संवाद साधला. यावेळी त्यांनी “लोकसत्ता वर्षवेध ही एक पुस्तिकाच नाही, तर तो वार्षिक ग्रंथ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्षभरातल्या घटनांची माहिती देणारं हे पुस्तक आहे. सर्व क्षेत्रांतील सखोल व अभ्यासपूर्ण मजकुरानं सजलेला हा अंक असतो”, असंही ते म्हणाले.
















