माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरीत्या भाजपात प्रवेश केला आहे. आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण भाजपात जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. त्यावर अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला होता.




















