मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक काल (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीये, “भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे. मराठा आरक्षणापासून ते चंदीगड महापौर पदापर्यंत सगळी फसवाफसवी सुरु आहे. १० टक्के आरक्षणाचा सरकारने जो फसवणुकीचा प्रकार केला तो मराठा समाजाला मान्य नाही”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.