कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात पार पडणार असून, कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज (२७ एप्रिल) कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे पार पडत आहे.