IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवताना दिसल्या. अशातच आता पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 





