चेंबूरमध्ये चाळीतील एका घराला आज (६ ऑक्टोबर) पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.