Ladki Bahin Yojna Jayant Patil: महायुती सरकारला ‘लाडकी बहीण योजने’चा फायदा होत असल्याचे लक्षात येताच आता महाविकास आघाडीकडूनही सत्तेत आल्यावर ही योजना बंद करणार नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाई येथे बोलताना ही योजना सुरू ठेवणार असल्याचा निर्वाळा दिला.‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात होते महाविकास आघाडी या योजनेच्या विरोधात असल्याचे चित्र सर्वत्र तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वरील खुलासा केला आहे.





















