राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. मतदारसंघातील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान उमेदवार आणि संबंधित पक्षांवर असेल. अशीच चुरस उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघातही पाहायला मिळणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय चित्र नेमकं काय आहे? बंडखोरीचा फटका कोणाला बसेल? याबाबत लोकसत्ताचे नाशिक विभागाचे ब्युरो चीफ अविनाश पाटील यांनी केलेलं हे विश्लेषण