काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. “आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असं पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. अशातच आता नाना पटोले यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.


















