Pune Chitale Bandhu Mithaiwale: पुण्यात चितळे बंधूंचे नाव वापरत, हुबेहुब पाकीट आणि इतर माहिती वापरत दुसऱ्याच चवीच्या बाकरवाडीची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली आहे. चितळे बंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार दिली आहे. त्या आधारे पुणे पोलिसांनी ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा नोंदवला आहे. तर आता चितळे स्वीट होमच्या वतीने सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आले आहे.