राष्ट्रवादी काँग्रसे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पोटातलं पाणी हलू न देणं ही जयंत पाटील यांची खासियत आहे. त्यांच्या मनातील फारसं कोणाला कधी कळलं नाही, असं म्हणत तटकरेंनी ही चर्चा फेटाळली.