कोकणची बुलंद तोफ आणि महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्या उत्तर देणारं एक तडफदार नेतृत्व अशी भास्कर जाधव यांची ओळख आहे. मात्र गुरुवारी महाराष्ट्राला त्यांचं एक वेगळंच रूप पाहालया मिळालं. निमित्त होतं ते घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नाचं. गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती. तिच्या लग्नात भास्कर जाधव भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.