Operation Sindoor: मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास भारतानं पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं. या एअर स्ट्राईकमध्ये भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं.आता ऑपरेशन सिंदूरवर देशभरातून प्रतिक्रिया दिली जात आहे. भारतातील ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणाले आहेत? ते जाणून घेऊयात…