Pakistan Violates Ceasefire Agreement Costing Life Of BSF Jawan MD. Imtiyaaz: पाकिस्तानकडून गोळ्यांचा वर्षाव होत असताना ते निधड्या छातीने सामोरे गेले. आणि कर्तव्यावर असतानाच त्यांना गोळी लागून वीरमरण आले. बीएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज हे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात १० मे सीमेलगतच्या आर एस पुरा भागात शहीद झाले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानने युध्दविरामास स्वतः मंजुरी दर्शवल्यावर अवघ्या काहीच तासात झालेल्या गोळीबारात इम्तियाझ यांना प्राण गमवावे लागले आहेत. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात तीच गत पाकिस्तानच्या (Pakistan) बाबतीत आहे का, असा प्रश्न आता पु्न्हा उद्भवला आहे. कारण, कालच सायंकाळी 5.00 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्यात आल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली.