Pimpari – Chinchwad 17 Year Old Girl Murder Case: दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका सतरा वर्षीय मुलीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार पिंपरी – चिंचवडमध्ये घडल्याची माहिती समोर येतेय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ११) रात्री ९ वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई कॉलनीमध्ये घडली. मध्यरात्री या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृत तरुणी ही वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील रहिवाशी असून त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला व त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या भाच्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नेमकी कोणती माहिती दिलीये हे आपण जाणून घेऊया.






















