Vikhroli Tree Collapsed One Man Dies: विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथील गणेश मैदान याठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळले. यात तेजस नायडू वय वर्ष २५ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यातील दोघे सुखरूप असून, घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले व या झाडाला कापून आता साईडला करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. कारण हे झाड मुळासकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे. त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.