मावळचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील शेळके यांच्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुनील शेळके यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप करत राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यावर आता सुनील शेळके यांनी उत्तर दिलं आहे.