डोंबिवलीत आज शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ सोडून दिपेश म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश घेतला. यावर अद्याप ठाकरे गटाची काहीही भूमिका समोर आलेली नाही पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गट मात्र या भागात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतेय. शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावरच आरोप करत तुम्ही युती धर्माला तिलांजली दिली असे म्हंटले आहे आणि असं असताना शिंदे साहेबांनी सुद्धा संयम ठेवू नये अशा शब्दात कदम यांनी एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांच्या वतीने आवाहन केले आहे.






















