Eknath Shinde: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. अशातच आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.





















