वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी बीडच्या वडवणीतील कवडगाव येथे पीडित डाॅक्टर कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डाॅक्टर आत्महत्ये प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवत आणि आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मनुवादी विचारसरणीच्या पुरस्कर्त्या असल्याचं म्हटलं आहे.





















