-
शंकर महादेवन यांच्यापासून झी युवावर सुरु झालेला 'सगरम'चा हा संगीतमय प्रवास, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, लोकशाहीर नंदेश उमप यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.
-
बुधवारी २२ मार्चला रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा खास एपिसोड आहे तर गुरुवार २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता स्वप्नील बांदोडकर आपली कला सादर करणार
-
गोड गळ्याचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा स्वप्नील बांदोडकर यांचे एकामागोमाग एक गायकी अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांसाठी चालून आली आहे. स्वप्नील बांदोडकर या नावाची खरेतर वेगळी अशी ओळख करून द्यायची गरजच नाही. सुमारे शंभर मराठी चित्रपट आणि विविध भाषांमधील पाचशेहून अधिक गाणी गाणारा स्वप्नील मराठीमधला सर्वात लोकप्रिय गायक आहे.
-
सुरेश वाडकर यांनी गायलेली 'लगी आज सावन की..', 'तुमसे मिल्के ऐसा लगा', 'छोड आये हम वोह गलीया..' ही आणि अशी असंख्य गाणी अनेक वर्ष संगीत क्षेत्रात अजरामर आहेत. हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये पार्श्वगायन करताना आणखी अनेक भाषांमध्ये त्यांचे प्रभुत्व आहे.
-
सुरेश वाडकर त्यांच्या दोन शिष्यांसोबत गाणार आहेत. एक तर स्वप्नील हे सर्वांनाच माहित आहे तर दुसरी शिष्या म्हणजे त्यांची मोठी मुलगी अनन्या. बुधवार २२ मार्चच्या एपिसोडमध्ये महेश कोठारेंची एक विशेष एन्ट्रीसुद्धा असणार आहे.

Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”