‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरीची घटना घडली आहे. कशिशने तिच्या मदतनीस सचिन कुमार चौधरीवर ४ लाख रुपये चोरल्याचा आरोप केला आहे. अंबोली पोलिसांनी सचिनविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कशिशने सांगितले की, सचिनने तिच्या कपाटातून पैसे चोरले आणि पन्नास हजार रुपये परत देऊन पळून गेला. पोलिसांनी सचिनचा शोध सुरू केला आहे.