हेमंत ढोमे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो आणि दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करतो. नुकतच त्याने आईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या. हेमंत आणि त्याची पत्नी क्षिती जोग यांची ‘चलचित्र मंडळी’ निर्मिती संस्था आहे. त्याने ‘फसक्लास दाभाडे’सह अनेक यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.