शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून ते मराठीचे धडे गिरवत आहेत. माध्यमांसमोर त्यांनी काही मराठी वाक्यं वाचून दाखवली. त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं की, उच्चारांमध्ये थोडी समस्या आहे, पण दोन महिन्यांत ते चांगलं मराठी बोलतील. अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, ज्या राज्यात राहतो तिथली भाषा शिकणं आवश्यक आहे. त्यांनी मराठी भाषेच्या प्रचाराबाबतही आपली भूमिका मांडली.