कर्नाटकातील गोकर्ण येथील जंगलात रशियन महिला नीना कुटीना (४०) आपल्या दोन मुलींसह गुहेत राहत असल्याचे आढळले. पोलिसांनी तिला सुरक्षितस्थळी हलवले. नीना कुटीनाने आपल्या मित्राला भावनिक संदेश पाठवला, ज्यात तिने जंगलातील आयुष्य उध्वस्त झाल्याचे म्हटले. ती आणि तिच्या मुलींना कारवार येथील आश्रमात ठेवण्यात आले असून त्यांना रशियात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.